श्रीमंत देशांची यादी जाहीर; हिंदुस्थानची चौथ्या स्थानावर झेप

श्रीमंत देशांची यादी जाहीर; हिंदुस्थानची चौथ्या स्थानावर झेप

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे. श्रीमंत लोकांच्या संख्येच्या बाबतीतही देशाने मोठी झेप घेतली आहे. नाईट फ्रँकच्या ग्लोबल वेल्थ रिपोर्ट-2025 मध्ये श्रीमंत देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात हिंदुस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. या अहवालात प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्मने म्हटले आहे की हिंदुस्थान जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास येत आहे. देशातील श्रीमंत व्यक्तींची संख्या (HNWIs) 85,698 वर पोहोचली आहे. त्यामुळे श्रीमंत लोकांच्या संख्येबाबत हिंदुस्थान जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे.

अहवालानुसार आता श्रीमंत लोकांच्या संख्येच्या बाबतीत हिंदुस्थानच्या पुढे तीन देश आहेत. त्यात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील श्रीमंत लोकांची संख्या सतत वाढत आहे. नाईट फ्रँकचा नवीन अहवाल याचे एक उदाहरण आहे. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची गती अशीच वाढणार आहे. 2028 पर्यंत देशातील अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या HNWIs 93,758 पर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

अब्जाधीशांच्या बाबतीत हिंदुस्थान जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे. देशातील अब्जाधीशांची संख्याही अनेक मोठ्या देशांपेक्षा जास्त आहे. अहवालानुसार 2024 मध्ये, जेशात अब्जाधीशांची संख्या 191 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 12% वाढ झाली आहे आणि या अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती 950 डॉलर अब्ज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;