सौदीने केला हिंदुस्थानसह 14 देशांचा वर्क व्हिसा ब्लॉक

सौदीने केला हिंदुस्थानसह 14 देशांचा वर्क व्हिसा ब्लॉक

सौदी अरबने 14 देशांचा वर्क व्हिसा निलंबित केला आहे. यामध्ये हिंदुस्थानचासुद्धा समावेश आहे. सौदीमध्ये सध्या हज यात्रा सुरू असल्याने सौदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा वर्क व्हिसा तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आल्याची माहिती सौदी सरकारने दिली आहे. हा निर्णय 30 जूनपर्यंत लागू असणार आहे. या निलंबनामुळे बांधकाम, आतिथ्य, घरगुती सेवा यांसारख्या क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या विदेशी कामगारांवर आणि सौदीमधील कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्लॉक वर्क व्हिसा ही सौदी अरेबियातील कंपन्यांना मोठय़ा संख्येने विदेशी कामगार नियुक्त करण्यासाठी मंजूर केलेली कोटा आधारित परवानगी आहे. 14 देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, जॉर्डन, येमेन, सुदान, इराक, इथियोपिया, नायजेरिया, लिबिया, केनिया आणि तुर्की यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;