स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शक्य असेल तेथेच युती! – प्रफुल्ल पटेल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शक्य असेल तेथेच युती! – प्रफुल्ल पटेल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात जेथे शक्य आहे, तेथे युती म्हणून सामोरे जाऊ. पण, जेथे शक्य नाही, तेथे स्वबळावर आणि ताकदीने निवडणूक लढू,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात पटेल बोलत होते. पटेल म्हणाले, ‘पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होणार आहोत. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होतानाच पहिल्या दिवसापासूनच सांगितले की, आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जेथे शक्य असेल, तेथे युती केली जाईल. जेथे शक्य नाही, तेथे स्वबळावर लढू.’

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या; पण विधानसभा निवडणुकीत आपल्याला 288 पैकी 237 जागा मिळाल्या. शेतकरी आणि लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतदान केले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत; पण जेथे शक्य नाही, तेथे स्वतंत्र लढणार आहोत.’

एका ताटात जेवलो हे कधीही विसरणार नाही! सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

सुनील तटकरे म्हणाले, ‘गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे चार महिन्यांनंतर येणाऱ्या या निवडणुकांना आपल्याला मोठ्या ताकदीने सामोरे जायचे आहे.’ महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून आम्हा महिलांना ताकद आणि आत्मविश्वास दिला.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;