1960 चा कॅलिफोर्निया अन् आताची भयावह स्थिती; अमेरिकेतील उद्रेक वंशवादाच्या दिशेने

1960 चा कॅलिफोर्निया अन् आताची भयावह स्थिती; अमेरिकेतील उद्रेक वंशवादाच्या दिशेने

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोरणाविरोधात उद्रेक उसळला आहे. अवैध स्थलांतरीताविरोधात शांततेच्या मार्गाने सुरू असलेला विरोध आता हिंसक वळणावर आला आहे. त्यातच विरोधाला न जुमानता ट्रम्प यांनी सैन्य तैनात केल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. आता अवैध स्थलांतरीतांविरोधातील उद्रेक वंशवादाच्या दिशेने वळत आहे. त्यामुळे अमेरिकेतील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील परिस्थिती अत्यंत बिकट होत चाचली आहे. अवैध स्थलांतरितांवर करण्यात येणारी कारवाई आणि अटकेविरोधात जनतेची निदर्शने सुरूच आहेत. आता या संपूर्ण परिस्थितीला हिसंक वळण लागले आहे. अशातच आता टेक्सासच्या 26 व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमध्ये काम करणारे रिपब्लिकन प्रतिनिधी ब्रँडन गिल सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ब्रँडन गिल यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय. त्यांच्या या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच हा वाद वंशवादाकडे वळला आहे.

सध्या अमेरिकेतील परिस्थिती भयावह होत आहे. हे दृश्य गिल यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून मांडले. त्यांनी 1960 च्या दशकातील कॅलिफोर्नियाची तुलना आजच्या काळातील कॅलिफोर्नियाशी केली आहे. गिल यांच्या मते अमेरिकेच्या या स्थितीला येथील अवैध स्थलांतर जबाबदार आहे. त्यांच्या या पोस्टवर वापरकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ब्रँडन गिल यांनी ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी फोटोओळही लिहिली आहे. “1960 चे कॅलिफोर्निया विरुद्ध आजचे कॅलिफोर्निया, असे त्यांनी म्हटले आहे.  मोठ्या प्रमाणात अवैध स्थलांतराने अमेरिकेची ओळखच बदलली आहे.” पहिल्या फोटोमध्ये 1960च्या दशकातील शांत समुद्रकिनाऱ्याचे दृश्य दिसत आहे, यामध्ये लोक आनंदात दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये लॉस एंजेलिस दंगलीतील भयावह परिस्थिती दाखवले आहे.

ब्रँडन गिल यांनी केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर टीका केली आहे. तसेच त्यांचे हिंदुस्थानसोबत असणाऱ्या नात्याचीही त्यांना आठवण करून दिली आहे. ब्रँडन गिल यांचे लग्न हिंदुस्थानी वंशाचे प्रख्यात रूढीवादी टीकाकार दिनेश डिसूझा यांची मुलगी डॅनियल डिसूझाशी झाले आहे.

एका यूजरने म्हटले आहे की, “हे खूप वंशवादी आहे… तुम्ही फक्त बेकायदेशीर स्थलांतर म्हटले नाही, तर तुम्ही ‘सामूहिक स्थलांतर’, कायदेशीर आणि बेकायदेशीर म्हटले आहे. याच अर्थ तुम्हाला कोणीही आवडत नाही. तर दुसऱ्याने कमेंट केली, “तुमची पत्नी अमेरिकन आहे आणि तुमचे सासरे हिंदुस्थानातील स्थलांतरित आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता वेगळ्याच मार्गाने जात आहे.

लॉस एंजेलिसमधील परिस्थिती चिघळली, हिंसाचाराला न जुमानता ट्रम्पने मरिनही केले तैनात

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;