मुलगी पाहिली की ‘विकेट’ जाते; युवराजला नडलेल्या क्रिकेटपटूचा 500 हून अधिक महिलांसोबत संबंध असल्याचा दावा

मुलगी पाहिली की ‘विकेट’ जाते; युवराजला नडलेल्या क्रिकेटपटूचा 500 हून अधिक महिलांसोबत संबंध असल्याचा दावा

वेस्ट इंडिजच्या संघाचे एकेकाळी क्रिकेट जगतावर वर्चस्व होते. 1970 ते 1990 या दोन दशकामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला म्हणजे क्रीडा वर्तुळातील अपसेट समजला जात होता. मॅक्लम मार्शल, जोएल गार्नर, कर्टली एम्ब्रोस, एंडी रॉबर्टस असे तगडे गोलंदाज वेस्ट इंडिजकडे होते. त्यांचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना अवघड होते. मात्र हळूहळू वेस्ट इंडिज क्रिकेटची रया गेली आणि आता बरेच खेळाडू देशापेक्षा लीग क्रिकेटला प्राधान्य देताना दिसतात.

टिनो बेस्ट हा देखील वेस्ट इंडिजचा खमक्या गोलंदाज होता. बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या टिनो बेस्ट याची तुलना एकेकाळी वेस्ट इंडिजच्या महान गोलंदाजांशी केली जात होती. मात्र त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द विशेष बहरली नाही. 5 फूट 8 इंच उंची असलेल्या टिनोला वेस्ट इंडिजकडून फक्त 57 सामने खेळण्याची संधी मिळाली.

गोलंदाजीत विशेष काही करू न शकलेल्या टिनोने 2012 मध्ये फलंदाजीत एक विक्रम केला होता. त्याने इंग्लंडविरुद्ध अकराव्या नंबरवर फलंदाजीला येत 95 धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम 2013 ला ऑस्ट्रेलियाच्या एश्टन एगरने इंग्लंडविरुद्ध 98 धावांची खेळी करत मोडला होता. हाच टिनो बेस्ट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बेस्टने ‘माइंड द विंडोज – माय स्टोरी’ या आत्मचरित्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामुळे क्रीडा वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

मी 500 हून अधिक महिलांसोबत झोपलो आहे, असे टिनो बेस्ट याने आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटले आहे. माझी कमकुवत बाजू मुली असून मला मुली खूप आवडतात. मला वाटते की मी जगातला सर्वात सुंदर टकलू माणूस आहे, असे म्हणत पुस्तकामध्ये त्याने स्वत:चा उल्लेख ‘ब्लॅक ब्रॅड पिट’ असा केला आहे.

टिनोच्या पहिल्या प्रियसीचे नाव मेलिसा होते. तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आपले वागणे बदलल्याचे टिनोने सांगितले. ब्रेकअपनंतर मी मुलींचा दिवाना झालो. मला मुलगी आवडली की मी तिला भेटायचो, बोलायचो आणि गोष्टी पुढे जायच्या. आतापर्यंत मी 500 हून अधिक महिलांशी संबंध ठेवले आहे, असेही टिनोने सांगितले. तसेच जगातील सर्वात सुंदर, आकर्षक आणि सुडौल मुली ऑस्ट्रेलियात असतात. 2005 ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा तिथे 40 हून अधिक महिलांशी संबंध बनवले, असेही त्याने सांगितले.

युवराजशी घेतलेला पंगा

‘इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025’मध्ये खेळताना टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह आणि टिनो बेस्ट यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. फायनल लढतीत वेस्ट इंडिज मास्टर्सचा सामना इंडिया मास्टर्ससोबत झाला होता. या लढतीत टिनो बेस्ट आणि युवराजमध्ये बाचाबाची झाली होती, अखेर ब्रायन लाराला मध्यस्थी करावी लागली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;