RCB for sale! आयपीएल 2025 चा विजेता बंगळुरुचा संघ खरंच विकणे आहे? युनायटेड स्पिरिटनं दिलं स्पष्टीकरण

RCB for sale! आयपीएल 2025 चा विजेता बंगळुरुचा संघ खरंच विकणे आहे? युनायटेड स्पिरिटनं दिलं स्पष्टीकरण

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मिळवले. अंतिम लढतीत पंजाब किंग्जचा पराभव करत बंगळुरूने तब्बल 18 वर्षानंतर आयपीएल चषक उंचावला. या विजयानंतर आरसीबीच्या विक्रीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. आरसीबीची मालकी मॅकडोवल्स व्हिस्की तयार करणारी कंपनी युनायटेड स्पिरिट लि. कडे आहे आणि ही कंपनी आपली भागिदारी विकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली.

युनायटेड स्पिरिट लि. ही फरार उद्योजक विजय मल्ला याची कंपनी होती. मल्ल्या दिवाळखोरीत निघाला आणि त्याने ही कंपनी ब्रिटिश मद्य कंपनी डियाजियोला विकली. त्यामुळे डियाजियो कंपनी हिच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मालक आहे. ही कंपनी आता आरसीबीतील आपली भागिदारी तब्बल 2 अब्ज डॉलर अर्थात 17 हजार कोटी रुपयांना विकणार असल्याचे समोर आले. या वृत्तामुळे युनायटेड स्पिरिट लि. कंपनीच्या शेअर्समध्येही मंगळवारी 3 टक्के वाढ झाली. त्यामुळे आयपीएल जिंकल्याचा फायदा उठवण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याची चर्चाही रंगली. मात्र, आता या चर्चा फक्त अफवा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून असा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे.

युनायटेड स्पिरिट लि. कंपनीने एक निवेदन जारी करत आरसीबीच्या विक्रीविषयी सुरू असल्याच्या वृत्तांचे खंडण केले आहे. याच संदर्भात बीएसई सर्व्हेलन्स डिपार्टमेंट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने एक इमेल पाठवत कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना डियाजियोने म्हटले की, ’10 जून 2025 रोजी तुम्ही इमेल पाठवत आमच्याकडे आरसीबीतील भागिदारीच्या विक्रीसंदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार, आम्ही हे स्पष्ट करतो ही आरसीबीच्या विक्रीच्या बातम्या तथ्यांवर आधारित नाहीत. आमचा असा कोणताही विचार नाही.’ यावरून युनायटेड स्पिरिट लि. कंपनीची पॅरेंट कंपनी डियाजियो आरसीबीतील भागिदारी विकण्याच्या तयारीत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;