नारायण राणे नावाच्या गुंडाविरुद्ध लढायला तयार, प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले

नारायण राणे नावाच्या गुंडाविरुद्ध लढायला तयार, प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले

भाजप खासदार नारायण राणे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यातील शाब्दिक वाद आता चांगलाच पेटला आहे. राणेंनी आमच्या विरोधात बोललात तर उलटय़ा करायला लावीन, असा इशारा दिल्यानंतर महाजनही चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज मंगळवारी महाजन यांनी क्रांती चौकात आंदोलन करत नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलात, असा हल्लाबोल केला. मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरोधात लढायला आणि कणकवलीत यायलाही तयार आहे, असे आव्हान देत राणेंविरोधात दंडही थोपटले.

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खासदार नारायण राणे यांनी मला धमकी दिल्याचा आरोप करत मंगळवारी दुपारी क्रांती चौकात आंदोलन केले. तत्पूर्वी पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महाजन आंदोलनावर ठाम राहिले. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात केली. राणेंनी मला धमकी दिली. त्यांचे कार्यकर्ते मला धमक्या देत आहेत. त्यामुळे मी इथे क्रांतीचौकात आलोय. मी इथे अर्धा तास वाट पाहणार आहे. पोलिसांनी तेवढीच परवानगी दिली आहे. त्यांना माझ्या पत्ता सांगितला आहे. त्यांनी यावे. काय करायचे ते करून दाखवावे. मला लेचपेचा समजू नका. मी प्रकाश महाजन आहे. येतो का? मी कुठे येऊ सांग. धमक्या काय देताय. इथे उभा आहे. सांगा तुम्ही, मी कणकवलीत येतो. तुमच्या बंगल्यापर्यंत येतो, असे चॅलेज करत महाजन यांनी राणेंविरोधात दंड थोपटले. या वेळी त्यांच्यासोबत मनसेचे जिल्हा संघटक अशोक पवार-पाटील यांच्यासह उपस्थित मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

मी घाबरणार नाही

नारायण राणे खासदार असून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला धमकी देतात. परंतु मी घाबरणार नाही. मी पोलीस आयुक्तांना कळवले आहे. तक्रारही करणार, मुख्यमंत्र्यांना एसएमएस केला आणि मुख्यमंत्री कार्यालयालासुद्धा कळवल्याचे महाजन म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;