मेट्रो प्रवासात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत द्या! युवासेनेची एमएमआरडीएकडे मागणी

मेट्रो प्रवासात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत द्या! युवासेनेची एमएमआरडीएकडे मागणी

रेल्वे, एसटी, बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी किमान 50 टक्के सवलत सरकारकडून दिली जाते. मेट्रो हीसुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून मुंबई आणि उपनगरात मेट्रो रेल्वेचे जाळे पसरले आहे. त्याचा वापर आणि फायदा रहिवाशांबरोबर शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी मेट्रो प्रवासात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी एमएमआरडीएकडे केली आहे.

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले असून यातून मुंबईकरांना सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. मेट्रो ही लोकल, बेस्ट, एसटीप्रमाणेच एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्यामुळे त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रवास सवलत देण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी एमएमआरडीए आयुक्तांना निवेदन दिले आहे. यात एमएमआरडीएनेदेखील इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेप्रमाणे मेट्रो रेल्वे प्रवासात सवलत देऊन विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;