वाट चुकलेली माहीममधील चिमुकली धारावीत सापडली, पोलिसांच्या झटपट शोधामुळे आईच्या कुशीत विसावली

वाट चुकलेली माहीममधील चिमुकली धारावीत सापडली, पोलिसांच्या झटपट शोधामुळे आईच्या कुशीत विसावली

माहीमच्या नया नगरात राहणारी सहा वर्षांची मुलगी भावासोबत दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली आणि हरवली. चालत ती माहीमहून थेट धारावीपर्यंत गेली. ती कुठेतरी बेपत्ता होण्याची दाट शक्यता होती. पण पोलिसांनी झटपट शोधमोहीम राबवून मुलाला सुखरूप शोधून काढली.

माहीमच्या रहेजा इस्पितळासमोरील नयानगर झोपडपट्टीत सितारा हासमी (33) ही तिचा पती व दोन मुलांसह राहते. सोमवारी सकाळी 9 वाजता सितारा हिचा मुलगा व सहा वर्षांची मुलगी असे दोघे दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले. मुलगा घरी परतला, पण मुलगी त्याच्यासोबत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला पण ती कुठेच मिळून आली नाही. त्यामुळे सितारा हिने माहीम पोलीस ठाणे गाठून मुलगी हरविल्याची तक्रार दिली. याची तत्काळ गंभीर दखल घेत परिमंडळ-5 चे उपायुक्त गणेश गावडे, माहीमचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांनी मुलीचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही चाळल्यावर मुलगी एकटीच धारावीच्या दिशेने पायी जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी धारावीत शोध घेतला असता मुलगी धारावीच्या बडी मस्जिदसमोर मिळून आली. पावणेदोन वाजता मुलगी सापडली. तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या एका तासात मुलीला शोधून उपायुक्त गणेश गावडे यांनी तिला सितारा हिच्या ताब्यात दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;