मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 227 वरून 236 केले जाणार यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र नगरविकास विभागाने आज प्रभागरचनेबाबत जारी केलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागांमध्येच घेतल्या जाणार आहेत. मुंबईसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरारसह सर्वच महापालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रभागरचनेचे प्रारूप तयार करून निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांची असेल. मान्यतेनंतर प्रभागरचना प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवून त्यावर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम प्रभागरचनेचा प्रस्ताव आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागेल. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर त्याला प्रसिद्धी द्यावी लागेल.

आदेशात काय…

– सर्व महापालिकांतील प्रभागरचना तीनपेक्षा कमी आणि पाचपेक्षा जास्त सदस्यीय नसावी.
– प्रभागरचनेची माहिती गुगल अर्थवर द्यावी. त्यात लोकसंख्या आणि अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्या अधोरेखीत केल्या जाव्यात.
– मुदतीतच निवडणुका घेणे शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेची मुदत संपणार त्या कालावधीच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महापालिकेच्या क्षेत्रात व हद्दीमध्ये बदल करू नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत एक सदस्यीय प्रभाग

मुंबईत एक सदस्यीय प्रभाग पद्धती असेल. अ, ब आणि क वर्गातील उर्वरित महापालिकांची प्रभागरचना चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार असेल. ‘अ’ वर्ग ः पुणे, नागपूर. ‘ब’ वर्ग ः ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड. ‘क’ वर्ग ः नवी मुंबई, वसई- विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली.

अशी होणार प्रभागरचना

प्रभागरचना कशी करावी यासाठीही काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार प्रभागरचनेची सुरुवात उत्तरेकडून ईशान्येकडे करावी आणि त्यानंतर पूर्व दिशेकडे सरकून शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना त्याच पद्धतीने क्रमांकही द्यावेत. एका इमारतीचे, चाळीचे, घराचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;