फडणवीसांची ‘ढिंच्याक’ डबल फास्ट, भाडे न वाढवता सर्वच लोकल एसी करण्याचा ‘विचार’ आहे!

फडणवीसांची ‘ढिंच्याक’ डबल फास्ट, भाडे न वाढवता सर्वच लोकल एसी करण्याचा ‘विचार’ आहे!

मुंब्रा येथील लोकल दुर्घटनेत चार निष्पाप प्रवाशांचे बळी गेले. लोकल प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सरकार आणि रेल्वे प्रशासनाची उदासीनता या दुर्घटनेने चव्हाटय़ावर आणली. राज्य आणि केंद्र सरकारबद्दल लोकल प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. सर्वच स्तरांतून जोरदार टीका होत आहे. त्यामुळे त्यावर बँडेज लावण्याची सरकारची धडपड सुरू झाली आहे. कोणतीही भाडेवाढ न करता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व लोकल एसी करण्याचा विचार आहे, असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांच्यावर मुंब्रा दुर्घटनेबाबत प्रश्नांची सरबत्ती केली.

– मुंब्रा दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. त्यावेळी लोकल प्रवाशांच्या अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजना सविस्तरपणे मांडल्या. मुंबईतील मेट्रो नेटवर्क पूर्ण न झाल्याने अजूनही लोकल गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठी आहे. त्यामुळे गाडय़ांची संख्या कशी वाढवता येईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, असे फडणवीस म्हणाले.

मुंबईतील मेट्रो रेल्वे एसी आहेत, पण लोकल ट्रेनमधून प्रवास करणारा प्रवाशीही काही दुय्यम नाही, त्यामुळे त्यांनाही एसी लोकल मिळावी असा सरकारचा आग्रह आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून कशी वाढवता येईल, यावरही सरकारचा भर राहील, असे ते म्हणाले.

खासगी कार्यालयांवर वेळ बदलण्यासाठी दडपण

लोकलची गर्दी विभागली जावी यासाठी कार्यालयीन वेळा पुढे-मागे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासकीय कार्यालयांना तशा वेळा पूर्वीच देण्यात आल्या आहेत, खासगी कार्यालयांच्याही वेळा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते थोडे कठीण आहे. कारण खासगी कार्यालये त्यांच्या नफ्याचा विचार करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;