गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं
गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव येथे घडली. या प्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पीडित मुलगी ही गोरेगावच्या आरे कॉलनी येथे राहत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय होती. ती सतत मोबाईलवर गेम खेळत असायची. त्यावरून तिचे आईवडील तिला मोबाईलवर गेम खेळू नको असे वारंवार सांगत असायचे. तरीदेखील ती मुलगी मोबाईलवर गेम खेळत असायची. सोमवारी तिच्या आईवडिलांनी तिला मोबाईल गेम खेळण्यासाठी दिला नाही. त्याचा तिला राग आला.
त्या रागातून तिने घरातील दरवाजाची आतून कडी लावली. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या आईवडिलांच्या लक्षात आला. त्याने याची माहिती आरे पोलिसांना दिली. काही वेळात आरे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरे पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांचा जबाब नोंदवून घेतला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List