Arvind Kejriwal News – माफीच्या साक्षीदाराने भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 59 कोटी दिले; ‘आप’चा गंभीर आरोप

Arvind Kejriwal News – माफीच्या साक्षीदाराने भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 59 कोटी दिले; ‘आप’चा गंभीर आरोप

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना 6 दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तपास यंत्रणांनी केलेल्या या कारवाईमुळे ‘आप’ आक्रमक झाली असून देशभरात निदर्शने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आप नेत्या आणि कॅबिनेट मंत्री आतिषी यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कथित मद्य घोटाळा प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराने भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 59 कोटी रुपये दिल्या आरोप आतिशी यांनी केला आहे.

कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीला आतापर्यंत ‘मनी ट्रेल’ (आर्थिक व्यवहार)चा एक पैसाही मिळालेला नाही. हीच बाब सर्वोच्च न्यायालयानेही ईडीला विचारली असून आपल्या आदेशातही याचा उल्लेख केला आहे. हे सर्व प्रकरण शरदचंद्र रेड्डी नावाच्या खोट्या व्यक्तीच्या साक्षीवर उभे असून त्याच्या अनेक कंपन्या आहेत. अरबिंदो फार्मा ही त्याची मुख्य कंपनी आहे, असे आतिशी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, शरदचंद्र रेड्डी यानेही दिल्लीतील दारुची दुकाने टेंडरच्या माध्यमातून घेतली होती. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याला अटकही केली होती. ईडीच्या चौकशीदरम्यान त्याने आपण अरविंद केजरीवाल यांना कधी भेटलोही नाही आणि त्यांच्याशी कधी संवादही साधला नाही म्हटले. त्यानंतर पुढच्याच दिवशी 10 नोव्हेंबर 2022 रोजी त्याला अटक करण्यात आली.

याच दरम्यान त्याने चार कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉण्ड भाजपच्या खात्यात जमा केले व त्यानंतर आणखी 55 कोटी असे असून 59 कोटी रुपये भाजपला दिले. ‘मनी ट्रेल’ इथे झाला असून पैसे भाजपच्या खात्यात गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक झाली पाहिजे. तसेच पुढे एप्रिल 2023मध्ये रेड्डीने 100 कोटी रुपये आपल्या दिल्याचे म्हटले आणि त्याला जामीनही मिळाला. त्याच्याच साक्षीमुळे दोन दिवसांपूर्वी केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असा आरोपही आतिशी यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;