बांगलादेशमध्ये अराजकतेचे सावट! राजधानीच्या मुख्य भागात निदर्शनांवर अनिश्चित काळासाठी घातली बंदी

बांगलादेशमध्ये अराजकतेचे सावट! राजधानीच्या मुख्य भागात निदर्शनांवर अनिश्चित काळासाठी घातली बंदी

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी अलिकडेच देशांतील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची घोषणा केली आहे. यामुळे विरोधी पक्षाकडून याला तीव्र विरोध केला जात होता. आता विरोधी पक्षासोबतच सरकारी कर्मचारी, शिक्षक युनूस सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे देशात तणापूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, ढाका महानगर पोलिसांनी (DMP) राजधानीच्या मुख्य भागात सर्व सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि रॅलींवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.

द डेली स्टारच्या वृत्तानुसार, सोमवारी पोलिसांनी मोहम्मद युनूस यांचे अधिकृत निवासस्थान जमुना गेस्ट हाऊस, बांगलादेश सचिवालय आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील केला. गेल्या अनेक आठवड्यांपासून ढाका सचिवालयात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे ही सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी अध्यादेशाविरुद्ध निषेध

युनूस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अध्यादेश जारी केला. यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला ‘गैरवर्तनाच्या’ आरोपाखाली कोणत्याही योग्य प्रक्रियेशिवाय14 दिवसांच्या आत कामावरून काढून टाकले जाईल. युनूस सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरुद्ध सरकारी कर्मचारी निषेध व्यक्त करत आहेत. या कायद्याला सरकारी कर्मचाऱ्यांना अवैध काळा कायदा’ म्हटले आहे आणि तो तात्काळ मागे घेण्याची मागणीही केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. त्यामुळे देशात तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली.आणि यासाठी पोलिसांनी मोठी निर्णय घेतला.

डीएमपी आयुक्त एसएम सज्जत अली यांनी या बंदीवर स्पष्टीकरण दिले आहे. राजधानीच्या या भागात निदर्शनांवर घातलेली बंदी ही ‘जनतेच्या हितासाठी आणि मुख्य सल्लागार (मोहम्मद युनूस) यांच्या सुरक्षिततेसाठी’ लागू करण्यात आली आहे. यापूर्वी, 10 मे रोजी सरकारने बांगलादेश बॉर्डर गार्ड (बीजीबी) आणि पोलिसांच्या विशेष युनिट्स (एसडब्ल्यूएटी) तैनात करून सरकारी इमारतींची सुरक्षा कडक केली आहे, असे ते म्हणाले.

Bangladesh Election Update – बांगलादेशात निवडणूकांचे बिगुल वाजणार; मोहम्मद युनूस यांनी तारीखच सांगितली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;