स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करा; निवडणूक आयोगाकडे अ‍ॅड. असीम सरोदे यांची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करा; निवडणूक आयोगाकडे अ‍ॅड. असीम सरोदे यांची मागणी

गेल्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने घाईघाईने बोगस मतदार यादीच्या आधारावर ही निवडणूक घेऊ नये. यापूर्वी कायद्यात अनेक उणिवा दिसल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत केल्या पाहिजेत, अशी मागणी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केली.

मतदार यादीमधील त्रुटी आणि बोगस मतदारांच्या नोंदणी संदर्भात अ‍ॅड. सरोदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सद्यस्थितीत न्यायालयात देखील चांगले वातावरण राहिले नाही. न्यायालयात याचिका अनेक दिवस प्रलंबित राहतात. निवडणूक आयोगाने स्वायत्तता गमावली असून, ते एका राजकीय पक्षाचे पाळीव झाले आहे. राज्यात ईव्हीएमपेक्षा सर्वात मोठा बोगस मतदारयाद्या घोटाळा झाला आहे. जगात मोठे प्रगत देश बॅलेट पेपरवर निवडणूक घेतात तशा आपल्याकडे झाल्या पाहिजे, असे अ‍ॅड. सरोदे म्हणाले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ज्या मतदार याद्या तयार केल्या त्याचआधारे संबंधित निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. सदर याद्या या संशयास्पद आणि चुकीच्या असल्याने त्याचा वापर आगामी निवडणुकीत करू नये, अशी मागणी त्यांनी केली. सध्याच्या सरकारमध्ये बोगस मतदार यादीद्वारे अनेक जण निवडून आले आहेत. 288 विधानसभा मतदारसंघापैकी 100 पेक्षा अधिक मतदारसंघातील निवडणुकीबाबत आव्हान याचिका दाखल झाल्या आहेत, याकडेही अ‍ॅड. सरोदे यांनी लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;