तुर्कस्तान एअरलाइन्सच्या विमानात सापडली स्फोटके, दिल्लीसह चार विमानतळांवर डीजीसीएकडून झाडाझडती; प्रवासी सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघडकीस

तुर्कस्तान एअरलाइन्सच्या विमानात सापडली स्फोटके, दिल्लीसह चार विमानतळांवर डीजीसीएकडून झाडाझडती;  प्रवासी सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघडकीस

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हिंदुस्थानवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानला मदत करणाऱया तुर्कस्तानच्या एअरलाइन्सच्या काही विमानांमध्ये स्पह्टके सापडल्याने खळबळ उडाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिल्लीसह चार विमानतळांवर झाडाझडती केली. त्यात प्रवासी सुरक्षेतील गंभीर त्रुटी उजेडात आल्या आहेत.

तुर्कस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानला मदत केली होती. त्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने खबरदारी घेतली आहे. याअंतर्गत दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरु विमानतळांवरील तुर्कस्तानच्या विमानांची झाडाझडती घेण्यात आली. त्यात काही विमानांमध्ये स्पह्टक पदार्थ सापडले. विशेष म्हणजे, संबंधित एअरलाईन्सने स्पह्टक पदार्थांबाबत कुठलीही चौकशी केली नव्हती. याची गंभीर दखल घेत डीजीसीएने तुर्कस्तानच्या एअरलाइन्सना सुरक्षेसंबंधी नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सक्त इशारा दिला आहे. तुर्कस्तानच्या विमानांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली असून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षेचे नियम धाब्यावर

प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच विमान पंपन्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मात्र तुर्कस्तान एअरलाइन्सकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवण्यात आले. ग्राउंड हँडलिंग एजंटमध्ये कोणताही करार झाला नव्हता. ग्राउंड  ऑपरेशन्स हाताळणाऱया मार्शलरकडे मार्शलिंग ऑपरेशन्ससाठी वैध पात्रता कार्ड नव्हते. अशा विविध त्रुटी समोर आल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;