RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार हा प्रसिद्ध अभिनेता?

RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार हा प्रसिद्ध अभिनेता?

विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची 18 वर्षांपासूनची आयपीएल जेतेपदाची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. बेंगळुरू टीमने मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत पंजाब किंग्जला सहा धावांनी पराभूत करत अखेर जेतेपदाची चव चाखली. या विजयासह विराट कोहलीचीही स्वप्नपूर्ती झाली. गेल्या 18 वर्षांपासून तो RCB टीमसोबतच आयपीएलमध्ये खेळत होता. या 18 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला मंगळवारी विजय अनुभवता आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्जच्या या अंतिम सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्साही होते. हा सामना सुरू होण्यापूर्वी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने म्हटलं होतं की आरसीबीने ही मॅच जिंकली तर तो विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार आणि विजय माल्याचे सर्व कर्ज फेडणार. आता RCB च्या या विजयानंतर त्या अभिनेत्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

विराट कोहलीचं मंदिर बांधणार असं वक्तव्य करणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून नकुल मेहता आहे. नकुलने ‘इश्कबाज’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर स्वत:चा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अत्यंत उत्साहाने तो म्हणाला, “अखेर 18 वर्षांनंतर तो दिवस आला, जेव्हा आपण तो विजयचा कप उचलणार. मिस्टर 18 (कोहली) हा निर्विवादपणे आयपीएल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो यंदा पहिली ट्रॉफी उचलणार आहे. तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात का? आरसीबीने आपल्याला संयमाचा खरा अर्थ शिकवला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

“फक्त हा सामना जिंका आणि हा सामना जिंकल्यास मी वचन देतो की मी कन्नड भाषा शिकेन आणि हा व्हिडीओ पुन्हा अपलोड करेन. मी दाक्षिणात्य नाश्ता खाण्यासही सुरुवात करेन. जिथे वायफाय चांगला असेल तिथे मी राहायला जाईन. तुम्ही फक्त हा विजय प्राप्त करा आणि त्यासाठी मी सर्वकाही करायला तयार आहे. मी विराट कोहलीसाठी मंदिर बांधेन, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणातही रसम खाईन. मी विजय माल्याचंही सगळं कर्ज फेडेन. तुम्ही फक्त हा सामना जिंका”, अशी वचनं तो या व्हिडीओत देताना दिसतोय. त्यामुळे आता आरसीबीच्या विजयानंतर नेटकरी त्याच्या अकाऊंटवर कमेंट करून विराटच्या मंदिराबद्दल सवाल करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;