कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे. मान्सून काळात पावसाने व्हीजीबिल्टी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश दिले आहेत. यंदा देशातील काही पर्वतरांगात टनेल कोसळुन अपघात घडले आहेत. कोकण रेल्वेला गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडलेले नाहीत. मान्सूनकाळात तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा सुरु होणार आहेत.

अशी आहे मान्सूनची सज्जता

कोकणात मान्सूनकाळात काही बिकट प्रसंग आल्यास  ARMVs व्हॅन रत्नागिरी आणि वेरणे येथे सुसज्ज ठेवल्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कचा प्रोब्लेम मदतीसाठी अडसर ठरु नये म्हणून या ARMVs व्हॅन कर्मचाऱ्यांना त्वरीत संपर्कासाठी सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या काळात राबविण्यात येत आहे. या काळात नेहमीच्या वेळापत्रका ऐवजी मान्सून वेळापत्रकाने ट्रेन धावत असतात. सातत्याने जिओ सेफ्टी कामांच्या गुणवत्तेमुळे कोकण रेल्वेचा प्रवास निर्धोकपणे सुरु असतो. पावसाच्या या 4 महिन्याच्या कोकणातील पावसात कोकण रेल्वे सुरळीत धावण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी 24 बाय 7 पेट्रोलिंग आणि ट्रॅक मॉनिटरिंगसाठी नेमलेले आहेत.

 दर एक किलोमीटवर EMC सॉकेट्स

रेल्वे ट्रॅकवर माती किंवा दरड कोसळणे, झाड कोसळणे, पाण्याची पातळी वाढणे, वादळी हवेचा आणि पावसाचा वेग वाढणे किंवा इतर कोणतीही बाधा आल्यास दर एक किलोमीटवर Emergency Communication (EMC) sockets लावण्यात आले आहेत. लोको पायलट,पेट्रोलिंग कर्मचारी,वॉचमन आणि ट्रॅक मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांना आणीबाणीच्या वेळी थेट नियंत्रण कक्षात मदत मागण्याची सुविधा EMC सॉकेटमध्ये दिलेली आहे. शिवाय मोटरमन आणि गार्ड्सना स्टेशन मास्तरांशी संपर्क करण्यासाठी वॉकी टॉकी सेट असणार आहेत.

* पर्जन्य पातळी मोजण्यासाठी सेल्फ रेकॉर्डींग रेन गेज मीटर 9 स्थानकांवर ( Mangaon, Chiplun, Ratnagiri, Vilwade, Kankavali, Madgaon, Karwar, Bhatkal and Udupi ) सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.

* महत्वाच्या नदी पुलांवर फ्लड वार्निंग सिस्टीम बसविण्यात आली आहेत. यात काळी नदी ( माणगांव आणि वीर ), सावित्री नदी पुल ( वीर आणि सापे वामने ) आणि वशिष्टी नदी पुल ( चिपळूण आणि कामाठे ) येथे नदीने धोक्याची पातळी ओलांडताच अधिकाऱ्यांना आपोआप अलर्ट मिळणार आहे.
* वादळी वाऱ्यांचा वेगाची पातळी मोजण्यासाठी चार महत्वाच्या रेल्वे वायाडक्ट आणि रेल्वे पुलांवर Anemometers बसविण्यात आले आहेत. पनवेल मार्ग (रत्नागिरी आणि निवसर दरम्यान), मांडवी पूल ( थिविम आणि करमाळी दरम्यान ), Zuari पूल ( करमाळी आणि वेरणा ) आणि श्रावस्ती पूल (होन्नावुर आणि मानकी दरम्यान).

Monsoon Patrolling and Surveillance

* महत्वाच्या आणि संवदेनशील स्पॉटवर प्रशिक्षित अशा 636 पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

* आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्णा येथील बोगद्यांच्या सुरुवातीला बीआरएन (वॅगन) उभ्या केलेल्या आहेत.

* वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेरणा, कारवार, भटकळ, आणि उडुपी आदी महत्वाच्या 9 लोकेशन्सवर Rail Maintenance Vehicles (RMVs) सुसज्ज ठेवल्या आहेत.

* माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी टॉवर वॅगन तैनात केल्या आहेत.

* अपघात झाल्यास पंधरा मिनिटांत सुसज्ज होईल अशी Accident Relief Train (ART) वेरणा स्थानकात उभी ठेवण्यात आली आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dream 11 आऊट! आता 30 हजार कोटींची संपत्ती असलेली कंपनी Team India च्या जर्सीवर झळकणार Dream 11 आऊट! आता 30 हजार कोटींची संपत्ती असलेली कंपनी Team India च्या जर्सीवर झळकणार
केंद्र सरकारने बेटिंग आणि जुगाराशी संबंधित ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मना लक्ष्य करणारे कठोर विधेयक मंजूर केले होते. त्यामुळे BCCI सोबतचा Dream...
संतापजनक! बीचवर फिरायला गेलेल्या मित्राला झाडाला बांधत मैत्रिणीवर सामूहिक अत्याचार
भाजपप्रणित मेघालयात उलथापालथ, ८ मंत्र्यांनी अचानक दिले राजीनामे; काय आहे कारण?
Pandharpur News – नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू
Photo – जालना जलमय, अनेकांच्या घरात शिरले पाणी
पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्याच पाहिजेत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश