लोकलमध्ये विसरलेली पावणेआठ लाखांची रोकड पोलिसांच्या दक्षतेमुळे सापडली

लोकलमध्ये विसरलेली पावणेआठ लाखांची रोकड पोलिसांच्या दक्षतेमुळे सापडली

लोकलमधून उतरण्याच्या गडबडीत एक ज्येष्ठ नागरिक असलेले प्रवासी त्यांची सात लाख 77 हजार रोख रक्कम ठेवलेली पिशवी लोकलमध्येच विसरले. ही बाब लक्षात येईपर्यंत लोकल निघून गेली होती. आपले पैसे गेले अशाच विचारात ते प्रवासी होते. पण रेल्वे पोलिसांनी त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले.

सुरेशकुमार श्रीवास्तव (67) असे त्या प्रवाशाचे नाव आहे. राम मंदिर स्थानकातून त्यांनी चर्चगेटला जाण्यासाठी अप जलद लोकल पकडली. त्यांना चर्नी रोड स्थानकात उतरायचे होते. पण लोकल त्या स्थानकात थांबणार नसल्याची उद्घोषणा झाल्याने श्रीवास्तव लगबगीने मुंबई सेंट्रल स्थानकात उतरले. यावेळी त्यांची 7 लाख 77 हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी लोकलमध्येच राहिली. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चर्चगेट स्थानक गाठून त्या लोकलच्या डब्यात तपासणी केली, पण पैशांची पिशवी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी रेल्वे गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक विजय खेडकर, निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित टेलर व पथकाने सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता श्रीवास्तव यांची पैशांची पिशवी वसईत राहणारा शिवकुमार मोर्या (20) हा तरुण घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्याला उचलून सहा लाख 52 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;