महायुती…क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 ते 12 जूनदरम्यान मराठवाडय़ात तीव्र जनआंदोलन

महायुती…क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 ते 12 जूनदरम्यान मराठवाडय़ात तीव्र जनआंदोलन

महायुतीने सत्तेच्या लोभापायी निवडणुकीपूर्वी  शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवत घोषणांचा पाऊस पाडला होता, मात्र सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी मराठवाडय़ात शेतकऱ्यांचे तीव्र जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.

5 ते 12 जून या कालावधीत हे आंदोलन उभारले जाणार आहे. सरकारला ‘क्या हुआ तेरा वादा?’ या शिर्षकाखाली जाब विचारून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडय़ातील नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आदींची बैठक पार पडली.

या बैठकीला शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, संपर्कप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर, आमदार पैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;