27 लाखांचे सोने चोरी प्रकरणी चौघांना अटक
दहिसर आणि कांदिवली येथील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातून 27 लाख 65 हजार रुपयांच्या सोन्याची चोरी झाली होती. या प्रकरणी कारागीरासह चौघांना कांदिवली आणि दहिसर पोलिसांनी अटक केली. दहिसर येथे राहणाऱ्या व्यावसायिकाच्या कारखान्यातून 24 लाखांचे सोने चोरी करून अनिसूरने पळ काढला होता. या कामात त्याला सोमनाथने मदत केली होती. पोलिसांनी याचा तपास करून दोघांना अटक केली. कांदिवलीच्या इस्लाम कंपाउंड येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखान्यात काम करणाऱ्या रज्जाक मलिक याने साडेतीन लाखांचे दागिने चोरी करून त्याने पळ काढला होता. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी रज्जाक आणि शेख यांना अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List