नितेश राणेंना सुनावणीला कायमस्वरूपी गैरहजर राहता येणार नाही, माझगाव कोर्टाने बजावले

नितेश राणेंना सुनावणीला कायमस्वरूपी गैरहजर राहता येणार नाही, माझगाव कोर्टाने बजावले

प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे मंत्री नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्याला कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती नितेश राणे यांच्या वकिलांनी आज दंडाधिकाऱ्यांना केली; मात्र ही विनंती दंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावत प्रत्येक सुनावणीला गैरहजर राहता येणार नाही असे राणेंना बजावले

महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार… खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे निराधार दावे करीत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्य मंत्री नितेश राणे बरळले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी खासदार राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावर महानगर दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्यापुढे आज सोमवारी सुनावणी झाली. गेल्या सुनावणीवेळी नितेश राणे यांना तातडीने समन्स बजावून न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावले होते. तेव्हा सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यातून त्यांनी 2 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन घेतला आहे. तसेच नितेश राणे हे मंत्री असल्याने त्यांना कायमस्वरूपी सुनावणीला उपस्थित राहता येणार नाही अशी बाजू राणे यांच्या वकिलांनी मांडली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;