म्हाडाच्या हायफाय घराचे विजेते वेटिंगवर, गोरेगावमधील इमारतीला अद्याप ओसी नाही

म्हाडाच्या हायफाय घराचे विजेते वेटिंगवर, गोरेगावमधील इमारतीला अद्याप ओसी नाही

म्हाडाच्या गोरेगाव प्रेम नगर येथील पहिल्यावहिल्या हायफाय प्रोजेक्टमधील 322 विजेते अद्याप वेटिंगवरच आहेत. जीम, स्विमिंग पूल, पोडियम पार्ंकग अशा हायफाय सुविधा या प्रकल्पात म्हाडाने दिल्या आहेत. मात्र इमारतींना अद्याप ओसी न मिळाल्यामुळे या विजेत्यांच्या घराचा ताबा रखडला आहे.

म्हाडाने 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबरला संगणकीय सोडत काढली होती. यात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या 1327 घरांचादेखील समावेश होता. गोरेगाव प्रेम नगर येथील 322 हायफाय घरे असलेल्या इमारतीचे बांधकाम मार्चपर्यंत पूर्ण करून विजेत्यांना एप्रिलमध्ये देकारपत्र पाठवण्याचे म्हाडाचे नियोजन होते. मात्र जून उजाडला तरी इमारतीला ओसी न मिळाल्यामुळे विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यात आलेले नाही. याशिवाय मालाड पूर्व येथील शिवधाम कॉम्पलेक्स तसेच खडकपाडा येथील शिवनेरी सोसायटी या इमारतींनादेखील ओसी न मिळाल्यामुळे येथील 222 विजेतेदेखील घराचा ताबा कधी मिळणार या प्रतीक्षेत आहेत.

इमारतीला ओसी मिळावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. ओसी मिळताच विजेत्यांना म्हाडामार्फत देकारपत्र देण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;