कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलीस अंमलदार, अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ उत्साहात

कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलीस अंमलदार, अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ उत्साहात

मुंबई पोलीस दलात आज स्फूर्ती देणारा पदोन्नती समारंभ पार पडला. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्टार व फीत लावून सन्मान करण्यात आला. आपण आतापर्यंत जबाबदारीने कर्तव्य बजावत आला आहात. परंतु पदोन्नतीमुळे तुमची जबाबदारी आणखी वाढली आहे. महिला सुरक्षा व सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणखी कटिबद्धतेने काम करूया, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी केले.

पदोन्नती हा फक्त प्रशासकीय सोपस्कार न राहता पदोन्नती ही अधिकारी व अंमलदारांसाठी एका प्रेरणास्रोत व्हावी यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी वेगळे पाऊल उचलले आहे. पदोन्नती आदेश जारी झाल्यानंतर लगेच येणाऱ्या 1 तारखेस सर्व पदोन्नती प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा ‘पदोन्नती समारंभ’ आयोजित करून त्यांचा उचित सन्मान करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. जर 1 तारखेला रविवार अथवा इतर शासकीय सुट्टी असल्यास हा समारंभ त्याच आठवडय़ातील सोमवारी घेण्यात यावा, असे स्पष्ट आदेश सर्व अपर पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार दक्षिण प्रादेशिक विभाग, पश्चिम प्रादेशिक विभाग आदी विभागात पदोन्नती समारंभ आयोजित केला होता.

आणखी ताकदीने काम करावे लागेल!

या वेळी पदोन्नती झालेल्या पोलीस शिपायांपासून सहाय्यक उपनिरीक्षकापर्यंत सर्वांना यथोचित स्टार व फित लावून त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मान करण्यात आला. आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहेच; पण गुन्हे रोखण्याचे कामदेखील आपल्याला करावे लागते. हे जरी असले तरी महिला सुरक्षा व सायबर गुन्हे रोखण्यासाठी आपल्याला आणखी ताकदीने काम करावे लागेल असे वरिष्ठांनी पदोन्नती झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;