लाडकी बहीण योजनेत चूक झाली! अजित पवार यांची जाहीर कबुली

लाडकी बहीण योजनेत चूक झाली! अजित पवार यांची जाहीर कबुली

महायुती सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना आणली होती. त्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेवरही आली, पण आता या योजनेबद्दल वादंग निर्माण झाला आहे. त्यातच लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी जाहीर कबुलीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दोन-तीन महिन्यांतच लगेच विधानसभा निवडणूक होणार होती, त्यामुळे घाईघाईत ही योजना सुरू केली गेली आणि अर्जदारांच्या पडताळणीसाठी वेळच मिळाला नाही.

गरजू नाहीत अशा महिलांनीही योजनेचे पैसे घेतले आहेत. तरीही ज्यांनी पैसे घेतलेत आणि नंतर त्या अपात्र ठरल्या आहेत त्यांचे पैसे काढून घेणार नाही.

आतापर्यंत अपात्र झालेल्या महिला

  • नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी – 7 लाख 70 हजार
  • संजय गांधी निराधार योजना – 2 लाख 30 हजार
  • 65 वर्षांपेक्षा जास्त वय – 1 लाख 10 हजार
  • चारचाकी वाहनांच्या मालक – 1 लाख 60 हजार
  • सरकारी नोकरी करणाऱया महिला – 2652

दोन महिन्यांचे तीन हजार रखडले

योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजून बँक खात्यात जमा झालेला नाही. 2100 रुपये द्यायचे तेव्हा द्या, पण दीड हजार तरी वेळेवर जमा करा अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मे आणि जून महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये येत्या 10 जून रोजी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

लाभार्थींचे उत्पन्न किती? केंद्राला हवी माहिती

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला निकषात बसतात का हे पाहण्यासाठी विविध पद्धतीने आणि विविध विभागांकडून माहिती घेतली जात आहे. आता उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी थेट केंद्रीय अर्थ मंत्रालयालाही विनंती करण्यात आली असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून समजते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;