असे हल्ले करू की सर्व काही राख होईल! टार्गेट केवळ युक्रेन नसेल… पुतीन यांचा पाश्चिमात्य देशांना गर्भीत इशारा

असे हल्ले करू की सर्व काही राख होईल! टार्गेट केवळ युक्रेन नसेल… पुतीन यांचा पाश्चिमात्य देशांना गर्भीत इशारा

युक्रेनने रशियावर केलेल्या ‘ड्रोन स्ट्राईक’नंतर दोन देशांतील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसह सर्वच पाश्मिचात्य देशांना गर्भित इशारा दिला आहे. असे हल्ले करू की सर्वकाही राख होईल. टार्गेट केवळ युक्रेन नसेल, अशी धमकीवजा प्रतिक्रिया पुतिन यांनी सोमवारी दिली.

युक्रेनने रविवारी रशियन लष्कराच्या चार हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले. त्यात रशियाची अनेक लढाऊ विमाने नष्ट झाली. या हल्ल्यानंतर रशिया चांगलाच खवळला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पहिली प्रतिक्रिया देताना पुतिन यांनी आरपारची भूमिका मांडली. ते म्हणाले, आम्ही युक्रेनला अशा वॉरहेड्सने प्रत्युत्तर देऊ, ज्याची उष्णता सूर्याच्या तापमानाइतकी तीव्र असेल. असा हल्ला करू की त्यात सर्वकाही राख होईल.

अमेरिका, नाटोला मोठा धोका

पुतिन यांचा इशारा युक्रेन व त्यांचे पाश्चिमात्य मित्रराष्ट्र असलेल्या अमेरिका आणि नाटोसाठी मोठा धोका मानला जात आहे. युक्रेनला नाटो आणि अमेरिकेकडून शस्त्रास्र पुरवठा केला जात आहे. त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या मदतीनेच युक्रेन रशियावर भयंकर हल्ले करण्यास सक्षम झाला आहे. त्यामुळे पुतिन यांनी थेट पाश्चिमात्य देशांनाच गर्भित इशारा दिला आहे.

तिसऱया महायुद्धाचे संकट आणखी गडद

रशियाकडे असलेली ओरेसोनिक वॉरहेड्स हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत. ती प्रति सेकंद 3 किलोमीटर वेगाने उडतात. तसेच टार्गेटवर कोसळताना 4000 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढते. ते तापमान सूर्याच्या तापमानाइतकेच भयंकर असते. त्यात मोठा विनाश करण्याची क्षमता आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनवर अण्वस्त्रांनी हल्ला केला तर तिसऱया महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. याच शक्यतेने अमेरिका, ब्रिटन आणि नाटोची चिंता वाढली आहे.

  • रशिया सध्या टार्गेटची निवड करीत आहे. यामध्ये टार्गेट युक्रेनपलीकडेही असू शकतात. आमच्या हल्ल्यानंतर झेलेन्स्की आणि त्यांच्या पाश्चात्य मालकांना पश्चाताप करावा लागेल!
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;