भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 60 फुटांपर्यंत फरफटत नेलं; चौघांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 60 फुटांपर्यंत फरफटत नेलं; चौघांचा जागीच मृत्यू

बीडमध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील निन्नूडजवळ तेलगाव-माजलगाव रस्त्यावर भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. यानंतर 60 फुटापर्यंत रिक्षाला फरफटत नेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मयत आणि जखमी सिरसाळा येथील रहिवासी आहेत. फारुख चाँद, शबाना फारुख, शेख नोहिद एजाज आणि फैजान रफिक सय्यद अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;