Sindhudurg News – कलमठमध्ये चोरट्यांचा धुमाकूल, 4 ठिकाणी बंगले फोडले; पोलिसांचे पथक दिवसभर ठाण मांडून

Sindhudurg News – कलमठमध्ये चोरट्यांचा धुमाकूल, 4 ठिकाणी बंगले फोडले; पोलिसांचे पथक दिवसभर ठाण मांडून

कलमठ-बिडयेवाडी येथील 4 बंद असलेले बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडत धाडसी चोरी केली आहे. हा चोरीचा प्रकार सोमवारी (02 जून 2025) सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी बंगल्यांमधील मौल्यवान वस्तू लंपास केल्या असल्याचा अंदाज आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. भरवस्तीत चोरट्यांनी बंगले फोडून धुमाकूळ उडवला आहे. मात्र या घरांमधील मालक नसल्यामुळे अधिकृत चोरी कितीची झाली याबाबत कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात दाखल नव्हती.

कलमठ बिडयेवाडी येथील परिसरात बंद असलेले बंगले संधी साधून चोरट्यांनी फोडले. बंगल्यांमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी चोरी केल्याचा अंदाज आहे. काही बंगल्यांमध्ये चोरट्यांनी आतील सामान विस्कटले आहे. बंगल्यांचे मालक बाहेर असल्याने चोरीत किती मुद्देमाल गेला हे समजू शकले नाही. चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कैद झाले आहेत. या चोरीवरून कणकवलीत पुन्हा एका चोरटे सक्रिय झाले आहेत. चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. चोरी झालेल्या घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व कणकवली पोलिसांचे पथक दिवसभर ठाण मांडून या बिडयेवाडी परिसरात होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;