महागडा घटस्फोट, तब्बल 3387 कोटींचे विभाजन!

महागडा घटस्फोट, तब्बल 3387 कोटींचे विभाजन!

जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर ऑस्ट्रेलियन अभिनेता हग जॅकमन आणि अभिनेत्री डेबोरा ली फर्नेस यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर आता ते कायदेशीररीत्या घटस्फोट घेणार आहेत. जॅकमन आणि डेबोरा यांनी त्यांच्या मालमत्तेच्या विभाजनाबाबत एक करार केला आहे. ज्यामध्ये तब्बल 387 दशलक्ष डॉलर (जवळपास 3387 कोटी रुपये) संपत्तीचा समावेश आहे.

जॅकमन आणि डेबोरा या दोघांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात असून त्यासाठी फक्त न्यायालयीन मंजुरीची आवश्यकता आहे. जॅकमन आणि डेबोरा यांना दोन मुले आहेत. ऑस्कर आणि आवा अशी त्यांची नावे आहेत, तर जिच्यासोबत जॅकमनच्या अफेअरच्या चर्चा आहेत, त्या सटॉन फॉस्टरने ऑक्टोबर 2024 मध्ये पती टेड ग्रिफिनला घटस्फोट दिला आहे. या दोघांना एक बाळ आहे. टेड हा पटकथा लेखक आहे.

घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर डेबोराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विश्वासघाताच्या वेदनादायी प्रवासातून गेलेल्या त्या सर्वांबद्दल माझ्या मनात संवेदना आहेत. ही एक खोलवर झालेली जखम आहे, असे डेबोराने म्हटले. जॅकमनने मात्र या प्रकरणी मौन बाळगणे पसंत केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;