मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माझ्यामुळेच; ‘एसंशि’ गटाचे प्रताप सरनाईक पुन्हा बरळले

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माझ्यामुळेच; ‘एसंशि’ गटाचे प्रताप सरनाईक पुन्हा बरळले

मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे, ती आमची लाडकी बहीण आहे, असे वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ‘एसंशि’ गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आज पुन्हा बरळले. मराठीचा सन्मान सर्वाधिक मीच केला, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माझ्यामुळेच मिळाला, असे ते म्हणाले. त्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीरा-भाईंदरमध्ये शनिवारी झालेल्या हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून टीका होऊ लागल्याने आज त्यांनी घुमजाव करण्याचा प्रयत्न केला. पण स्पष्टीकरण देताना त्यांचा पाय आणखी खोलात गेला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मीच सर्वाधिक प्रयत्न केले असा अजब दावा त्यांनी केला.

माझ्या ओवळा-माजिवडा मतदारसंघातील रस्त्यांना साहित्यिक विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत साहित्यिकांची नावे मीच दिली आहेत, असेही सरनाईक म्हणाले. शनिवार असल्याने काहीच बातमी नाही म्हणून आपली बातमी प्रसारमाध्यमांनी पेरली, पत्रकारांनी नको त्या बातम्या पेरू नये, असे म्हणत त्यांनी माध्यमांवरही खापर फोडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;