ठाण्यातील खासगी शाळेच्या मनमानीला चाप, शिक्षण सेविकेच्या निलंबनाची शाळा न्यायाधिकरणासमोर होणार सुनावणी

ठाण्यातील खासगी शाळेच्या मनमानीला चाप, शिक्षण सेविकेच्या निलंबनाची शाळा न्यायाधिकरणासमोर होणार सुनावणी

शिक्षण सेविकेला तडकाफडकी कामावरून काढून टाकणाऱ्या ठाण्यातील एका खासगी शाळेला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. या निलंबनाची सुनावणी शाळा न्यायाधिकरणासमोरच होईल, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळेतील शिक्षकांसाठी राज्य शासनाने अद्याप नियम तयार केलेले नाहीत. त्यामुळे या निलंबनाची सुनावणी शाळा न्यायाधिकरणासमोर होऊ शकत नाही, असा दावा शाळेने केला होता.

न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने हा दावा फेटाळून लावला. शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये लागू झाला. या शिक्षण सेविकेचे निलंबन 2004 मध्ये झाले आहे. परिणामी तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शाळा न्यायाधिकरणासमोर सुनावणी होऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले व शाळा संस्थेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण 

वंदना भालेराव ही महिला ठाण्यातील माझी आई शाळेत 2001 मध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू झाली. 2004 मध्ये शाळेने तिला कामावरून काढले. त्याविरोधात या महिलेने नवी मुंबईतील शाळा न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. यात शाळेने हस्तक्षेप अर्ज केला. हा अर्ज न्यायाधिकरणाने फेटाळून लावला. त्याला शाळेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

शाळेचा युक्तिवाद  

शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळेतील शिक्षकांच्या अपिलांची सुनावणी झाली पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र या कायद्यांतर्गत नियम तयार होईपर्यंत शाळा न्यायाधिकरणाने अपिलांची सुनावणी घेऊ नये, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे भालेराव यांच्या अर्जावर न्यायाधिकरण सुनावणी घेऊ शकत नाही, असा युक्तिवाद शाळेने केला होता. तो न्यायालयाने मान्य केला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;