मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; साडेपाच कोटींचा गंडा घालणारा शिंदे गटाचा सहसंपर्कप्रमुख कुटुंबासह फरार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; साडेपाच कोटींचा गंडा घालणारा शिंदे गटाचा सहसंपर्कप्रमुख कुटुंबासह फरार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे याने महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 36 जणांचे साडेपाच कोटी रुपये हडप केले आहेत. कुटुंबासह फरार असलेल्या सोनवणेचा दोन महिन्यांपासून पोलिसांना शोध लागत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 36 जणांना साडेपाच कोटी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण मार्च 2025 मध्ये चव्हाटय़ावर आले. कर्जखाते नसतानाही बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील महाराष्ट्र बँकेचा शाखा व्यवस्थापक सुभाष कौटे याच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे हा असल्याचे चौकशीत समोर आले आहे. राजकीय दबावामुळे कासवगतीने तपास सुरू असल्याने सोनवणे हा कुटुंबासह नाशिकमधून फरार झाला आहे. या गुह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;