लैंगिक अत्याचाराच्या गुह्यात आरोपी 30 वर्षांनंतर निर्दोष, दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय

लैंगिक अत्याचाराच्या गुह्यात आरोपी 30 वर्षांनंतर निर्दोष, दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय

लैंगिक अत्याचाराच्या गुह्यात पीडित मुलीचा जबाब ‘विश्वसनीय’ असणे आवश्यकच आहे. पीडित मुलीचा जबाब विश्वसनीय असेल तरच आरोपीचे दोषत्व सिद्ध करण्यासाठी केवळ तिचा जबाब पुरेसा ठरू शकतो, असे निरीक्षण नोंदवत दिंडोशी सत्र न्यायालयाने नोंदवला सबळ पुराव्याअभावी 30 वर्षांपूर्वीच्या गुह्यात आरोपीची निर्दोष सुटका केली.

आरोपी रोशनलाल ठाकूरला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचे अॅड. स्वप्नील कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. रोशनलाल हा मागील नऊ वर्षे तुरुंगात होता. केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने तो तुरुंगात खितपत पडला होता. त्याला ‘दर्द से हमदर्द तक’ संस्थेने रोशनलालला कायदेशीर मदत पुरवली. खटला सुरू झाल्यावर केवळ 23 दिवसच केस चालली. रोशनलालला 10 जुलै 1995 रोजी अटक केली होती. नंतर 30 ऑक्टोबर 1995 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली होती. आरोपीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने 15 ते 16 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा आरोप होता. तथापि, पीडित मुलीने आरोपीविरोधात तक्रार केलीच नव्हती, असे सांगून पोलिसांनी केलेले आरोप नाकारले. त्याची गंभीर दखल घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी आरोपी रोशनलाल ठाकूरला सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. सरकारी पक्षाने पीडित मुलीव्यतिरिक्त एकाही साक्षीदाराचा जबाब नोंदवलेला नाही. तसेच पोलिसांनी नोंदवलेल्या पीडित मुलीच्या जबाबाला पुष्टी देणारे इतर सबळ पुरावे नसल्याचे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दिलासा दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;