Sikkim Landslide – सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, 500 पर्यटक अडकले
गेले काही दिवस उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक मुख्य मार्गावर भूस्खलन झाल्याने विविध ठिकाणी सुमारे 500 पर्यटक अडकले आहेत. चुंगथांग ते लाचेन आणि लाचुंगला जोडणारा रस्ता सर्वाधिक प्रभावित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत उत्तर सिक्कीममधील पर्यटकांसाठी कोणतेही नवीन परवाने जारी केले जाणार नाहीत.
उत्तर सिक्कीममध्ये प्रवास करणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने पर्यटकांना केले आहे. तसेच, प्रशासनाने उत्तर सिक्कीममध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांना हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान अनुकूल होताच रस्ते मोकळे करण्याचे आणि पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले जातील, असे प्रशासनाने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List