Pune News – पुण्यात भरधाव कारने MPSC च्या 12 विद्यार्थ्यांना उडवले, सदाशिव पेठेत मोठी दुर्घटना

Pune News – पुण्यात भरधाव कारने MPSC च्या 12 विद्यार्थ्यांना उडवले, सदाशिव पेठेत मोठी दुर्घटना

पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारने उडवल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली. सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालकाला पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. जयराम शिवाजी मुळे असे आरोपी चालकाचे तर दिगंबर यादव शिंदे आणि राहुल गोसावी अशी अन्य आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

यापैकी तिघांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात तर इतर नऊ जणांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात चार विद्यार्थ्यांचे पाय मोडले. सर्व विद्यार्थी भावे हायस्कूलजवळील चहा टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते, त्यावेळी हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

सदाशिव पेठ हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात स्पर्धा परिक्षांचे क्लासेस असल्याचे राज्यातील अनेक भागांतून विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससीची तयारी करण्यासाठी येतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई विद्यापीठाचा 40 लॉ कॉलेजेसना दणका, प्रवेशबंदी आणि 1 लाखाचा दंडही, काय आहे प्रकरण  ? मुंबई विद्यापीठाचा 40 लॉ कॉलेजेसना दणका, प्रवेशबंदी आणि 1 लाखाचा दंडही, काय आहे प्रकरण ?
मुंबई विद्यापीठाने कडक कारवाई करत 40 लॉ कॉलेजेसना प्रवेशबंदी केल्याने त्यांना मोठा दणका बसला आहे. मुंबई विद्यापीठाने 74 पैकी 40...
पराभवानंतर हार्दिक पांड्या रडला; पूर्व पत्नी नताशाची पोस्ट चर्चेत
आम्ही पती-पत्नी नसलो तरी..; गर्लफ्रेंड गौरी अन् पूर्व पत्नींबद्दल काय म्हणाला आमिर खान?
मुश्रीफांची सत्ता नावालाच; जिल्ह्याची आर्थिक नाडी भाजपच्या हाती
कात्रज तलावातून काढलेला गाळ पुन्हा तलावात! पालिकेचा नियोजनशून्य कारभार
ओढ पंढरीची… दिव्यांगांची पायी वारी, 15 जण 35 दिवसांत करणार 400 किलोमीटरचा प्रवास
साई संस्थानच्या दक्षिणा पेटीतील दीड लाख लंपास, शिपायावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल