Pune News – पोहताना दम लागल्याने तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

Pune News – पोहताना दम लागल्याने तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

तलावात पोहताना दम लागल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकण परिसरात घडली. या घटनेमुळे चारही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

चारही कुटुंब उदरनिर्वाहासाठी चाकण परिसरात आली होती आणि भाड्याच्या खोलीत राहत होती. शनिवारी दुपारी चारही मुलं चाकणजवळील कडाचीवाडी हद्दीतील पाझर तलावात अंघोळीसाठी गेली होती. मात्र पोहताना दम लागल्याने चौघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ उलटला तरी मुलं घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला.

शोध घेत असताना पाझर तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;