Beed News – कर्जाचे पैसे वसुल करुनही सावकाराकडून जीवे मारण्याची धमकी, व्यापाऱ्याने जीवन संपवलं

Beed News – कर्जाचे पैसे वसुल करुनही सावकाराकडून जीवे मारण्याची धमकी, व्यापाऱ्याने जीवन संपवलं

कर्जाचे व्याजासह परतफेड केल्यानंतरही सावकार आणखी पैशाची मागणी करत होता. पैसे न दिल्यास चटके देऊन संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिल्याने अखेर या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली. संजय कांकरिया असे आत्महत्या केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय कांकरिया यांनी अमृत भोसले आणि दीपक साळुंके या दोघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. कांकरिया यांनी सहा पटीने हे पैसे परत केले. तरीही भोसले आणि साळुंके त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करत होते. पैसे दिले नाही तर तुझ्यासह कुटुंबाला जिवंत मारू अशी धमकी सावकारांनी त्यांना दिली.

अखेर सावकारांच्या जाचाला कंटाळून कांकरिया यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना चिट्ठी लिहून जीवन संपवले. यानंतर भोसले आणि साळुंके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;