IPL 2025 – रोहित फॉर्मात आलाय, मुंबईच चॅम्पियन होणार…; इंग्लंडच्या माजी खेळाडूच भाकीत
IPL 2025 च्या क्वालिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाब किंग्जचा (PBKS) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईने गुजरातचा पराभव करत फायनलच्या दिशेने आगेकूच केली आहे. आता मुंबईचा सामना पंजाबविरुद्ध होणार आहे. या दोन संघांपैकी एक संघ 3 जून रोजी होणाऱ्या फायनलमध्ये बंगळुरूला भिडणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा माजी खेळाडू मोईन अलीने IPL 2025 ची ट्रॉफी कोण उंचावणार याचं भाकीत करत मुंबई इंडियन्सच्या बाजूने आपला कौल दिला आहे.
मोईन अलीने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे आयपीएल 2025 च्या विजेतेपदाचे दावेदार असल्याचे म्हटलं आहे. तो म्हणाला की, मी पहिल्यापासूनच म्हणत आलो आहे की, जर KKR विजयी नाही झाली, तर मला मुंबई इंडियन्य विजेतपदाची प्रबळ दावेदार वाटत आहे. त्याचबरोबर RCB चा संघ सुद्धा चांगल्या फॉर्मात असून एक मजबूत संघ म्हणून RCB ने आपला दबदबा दाखवला आहे. पण RCB आणि मुंबई इंडियन्स जर फायनलमध्ये एकमेकांना भिडणार असतील, तर मी मुंबईच्या बाजूने आहे”, असं Beard Before Cricket ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोईन अली म्हणाला आहे.
रोहित शर्माने गुजरातविरुद्ध विस्फोटक अंदाजात 81 धावांची खेळी केली. रोहितच्या दमदार कामगिरीमुळे संघ आता मजबूत स्थितीमध्ये आला आहे. त्यामुळे मुंबई आता विजेतेपदाची प्रबळ दावेदार बनली आहे. “रोहित मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. तो आता फॉर्मात आला आहे. त्यामुळे मला वाटत आहे मुंबईच चॅम्पियन होईल”, असं मोईन अली म्हणाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List