व्याघ्र संवर्धनतज्ज्ञ वाल्मीक थापर यांचं निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्याघ्र संवर्धनतज्ज्ञ वाल्मीक थापर यांचं निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्याघ्र संवर्धनवादी वाल्मीक थापर यांचे शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर दिल्लीतील लोधी विद्युत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाल्मीक थापर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वन्यजीव संरक्षणासाठी, विशेषतः वाघांच्या संरक्षणासाठी समर्पित केले. त्यांनी राजस्थानमधील रणथंभौर राष्ट्रीय उद्यानात वाघांच्यासंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते 150 हून अधिक सरकारी समित्या आणि कार्यदलांमध्ये सहभागी होते. यामध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचाही समावेश होता. 2005 मध्ये त्यांची टायगर टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. ही टास्क फोर्स यूपीए सरकारने स्थापन केली होती. वाल्मिकींचा असा विश्वास होता की, वाघांना वाचवण्यासाठी अशा क्षेत्रांची आवश्यकता आहे जिथे मानवांचा कोणताही हस्तक्षेप नसेल.

ते म्हणाले की, वाघांसाठी नैसर्गिक राखीव क्षेत्र असले पाहिजे, जे फक्त त्यांच्यासाठी असावे. त्यांनी 30 हून अधिक पुस्तके लिहिली आणि संपादित केली. यापैकी ‘लँड ऑफ द टायगर: अ नॅचरल हिस्ट्री ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट’ (1997) आणि ‘टायगर फायर:500 इयर्स ऑफ द टायगर इन इंडिया’ हे प्रसिद्ध आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;