Latur News – वाहनासह एक लाखांहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Latur News – वाहनासह एक लाखांहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

लातूर शहरातील इस्लामपूर भागातील एका घरावर धाड टाकून एक लाख आठ हजार रुपयांचा गुटखा, वाहनांसह जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

अवैध धंद्यावर कठोर कारवाईसाठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई केली जात आहे. 30 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी प्रतिबंधित गुटखा घरामध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (30 मे 2025) दुपारी लातूर शहरातील इस्लामपूर भागातील घरावर छापा मारला. यावेळी घरामध्ये महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 1 लाख 8 हजार 216 रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त करत रामेश्वर नामेदव नाईकवाडे (37) याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अंमलदार रियाज सौदागर, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, राहुल कांबळे, नितीन कठारे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;