Jalna News -मित्रासोबत गोदावरी नदीत पोहायला गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला

Jalna News -मित्रासोबत गोदावरी नदीत पोहायला गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला

मित्रासोबत गोदावरी नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालन्यात घडली. ज्ञानेश्वर बाबुराव खराद (19) असे मयत तरुणाचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोमलगाव गावावर शोककळा पसरली आहे.

बेसुमार वाळू उत्खननामुळे गोदावरी नदी अधिक खोल झाली आहे. यामुळे ज्ञानेश्वरला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मित्राने गावात धाव घेत गावकऱ्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.

ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या तरुणांनी दोन तास पाण्यात शोध घेतल्यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला. एककुलता एक मुलगा गेल्याने खराद कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वर खराद नुकताच बारावी परीक्षा पास झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काही गोष्टी बोलायच्या नसतात; कोकाटेंना कानपिचक्या काही गोष्टी बोलायच्या नसतात; कोकाटेंना कानपिचक्या
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून होणाऱ्या बेछूट वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सगळ्याच गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या....
विशाळगडावरील 14 अतिक्रमणे जमीनदोस्त, 7 तासांची संयुक्त कारवाई
मद्यपी वाहनचालकाला न्यायालयीन कोठडी
ठाण्यातील खासगी शाळेच्या मनमानीला चाप, शिक्षण सेविकेच्या निलंबनाची शाळा न्यायाधिकरणासमोर होणार सुनावणी
बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू, दिंडोरी हादरले
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 80 हजार झोपडीधारकांना दिलासा! ‘खासगी वने’ म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी ‘संरक्षित जंगल’ क्षेत्रातून वगळण्याचा ठराव मंजूर 
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; साडेपाच कोटींचा गंडा घालणारा शिंदे गटाचा सहसंपर्कप्रमुख कुटुंबासह फरार