Mumbai news – बोरिवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Mumbai news – बोरिवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मुंबईतील बोरिवली येथे पार्किंगची लिफ्ट कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे. शुभम मदनलाल धुरी (वय – 30) असे मृताचे नाव आहे, तर सुनजीत यादव (वय – 45) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी ही घटना घडली. बोरिवली पश्चिम येथील लिंक रोडवरील ओम प्रथमेश या 21 मजली इमारतीची कार पार्किंग लिफ्ट कोसळली. याखाली दोन जण अडकले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही बाहेर काढले आणि पोलीस व्हॅनमधून बीडीबीए शताब्दी रुग्णालयात दाखल केले. दुपारी 12 वाजून 59 वाजता शुभम धुरी याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर सुनजीत यादव यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना सीटी स्कॅनसाठी रेफर करण्यात आले आहे.

भायखळ्यात रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळला; एका महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;