सलमान खानच्या कडेवर दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता अन् सलमानच्या नायिकेचा नवरा, ओळखलंत का कोण?

सलमान खानच्या कडेवर दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता अन् सलमानच्या नायिकेचा नवरा, ओळखलंत का कोण?

अनेकदा सेलिब्रिटी त्यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. कधीकधी तर काही सेलिब्रिटींना ओळखणंही कठीण होतं. असाच एक फोटो बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननेही त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सलमानच्या तरूणपणाचा असून त्याच्या कडेवर असलेला लहान मुलगा मात्र आता एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

सलमानच्या कडेवर असलेला लहान मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता 

सलमान खानने केलेल्या पोस्टमध्ये तुम्हाला दिसत असेल की सलमानच्या कडेवर एक लहान मुलगा आहे. सलमानने स्वतः हा फोटो त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले आहे “उद्या लाँच होत आहे… उद्या पाहूया हा मुलगा आज कसा दिसतोय…”. हा मुलगा कोण आहे ते ओळखणं कठीण जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फोटोतील हा लहान मुलगा आज नावाजलेला अभिनेता आहे शिवाय सलमान खानसोबत काम केलेल्या त्याच्या अभिनेत्रीचा पती आहे.


आताही सलमान अन् या अभिनेत्याचं आहे खास नातं

सलमान खानच्या कडेवर असलेला हा अभिनेता झहीर इक्बाल आहे. जो आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा पती आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जावई आहे. कमेंटमध्येही सर्व नेटकऱ्यांनी हेच म्हटलं आहे. तसेच सलमान खानच्या या पोस्टवर भरभरून प्रतिसाद दिला आहे. एवढंच नाही तर सलमान खानचे झहीर लहान असतानाचे त्याच्यासोबतच अनेक फोटो आहेत. एवढच नाही तर आताही सलमान आणि झहीरमधलं नातं तेवढंच खास आहे. हे अनेक पोस्टमधून समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)


दरम्यान झहीर इक्बालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, झहीर एक प्रसिद्ध अभिनेता आहे. तो नोटबुक चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. तो प्रनूतन बहलसोबत नोटबुकमध्ये दिसला.

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर; काठमांडूत हिंदू राष्ट्र आणि राजशाही पुनर्स्थापनेसाठी आंदोलन नेपाळमध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर; काठमांडूत हिंदू राष्ट्र आणि राजशाही पुनर्स्थापनेसाठी आंदोलन
नेपालला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची आणि राजशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी जोर धरत आहे. यातच राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष (आरपीपी) आणि आरपीपी-नेपाल...
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, पार्टीदरम्यान नॉर्थ कॅरोलिनात हिंसक घटना; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी
आता होणार धारावीचा पुनर्विकास; असा बदलणार चेहरामोहरा
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद
‘अजित पवार तुमचा माणूस…’, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा अमोल मिटकरींवर घणाघात
vastu tips: वास्तूनुसार तुमच्या स्वयंपाकघर ‘या’ रंगांनी सजवा, घरातील सदस्य राहातील हेल्दी….
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पर्वणी जाहीर, जाणून घ्या अमृतस्नानाच्या तारखा