दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणतात, मला माहिती नाही!
शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जात पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले होते. या दोन्ही पक्षांतील फूट, पक्षाचे नाव आणि चिन्ह यासंदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले. आता यावर शरद पवार यांनी स्वत:च भाष्य केले असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत ‘मला माहिती नाही’, असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावं, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच दिली आहे. त्यामुळे या चर्चांना उधाणा आले. यावर दोन्ही पक्षातील नेत्यांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. या एकत्रिकरणाला अजित पवार गटातील सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याच्याही बातम्या आहे. दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे होत असताना आता शरद पवारांनी याबाबत मला माहिती नाही असे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List