हिंदुस्थानच नाही तर आमची रणनीतीही बदलली; सिंगापूरमध्ये CDM जनरल अनिल चौहान यांनी पाकड्यांना सुनावले

हिंदुस्थानच नाही तर आमची रणनीतीही बदलली; सिंगापूरमध्ये CDM जनरल अनिल चौहान यांनी पाकड्यांना सुनावले

सिंगापूरमध्ये सध्या सांगरी – ला डायलॉग द एशिया सिक्युरिटी समिट 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हिंदुस्थानचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान सहभागी झाले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानने केलेल्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. तसेच दहशतवादाबाबत पाकिस्तानला सुनावले. फक्त हिंदुस्थान बदललेला नाही तर हिंदुस्थानची रणनीतीही बदलली आहे, असे ते म्हणाले.

सांगरी – ला डायलॉग द एशिया सिक्युरिटी समिट हा आशियातील प्रमुख कार्यक्रम मंच आहे. शुक्रवार ते रविवार दरम्यान याचे आयोजित केले जातो. या महत्त्वाच्या संवादादरम्यान, जनरल चौहान यांनी या पूर्वीचे, आत्ताचे युद्ध आणि भविष्यातील युद्ध’ या विषयावर भाषण दिले. हिंदुस्थान आता कोणत्याही ठोस रणनीतीशिवाय पुढे जात नाही. जर आपल्याला पाकिस्तानकडून फक्त शत्रुत्वच मिळाले तर दोन्ही देशांमध्ये अंतर ठेवणे हीच सर्वोत्तम रणनीती असू शकेल, असे ते म्हणाले.

जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सामाजिक विकास, अर्थव्यवस्था, उत्पन्न यांसह प्रत्येक बाबतीत पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे होता. पण आज हिंदुस्थान अर्थव्यवस्था, मानवी विकास आणि सामाजिक विकास यासह प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. हा योगायोग नाही तर एका रणनीतीचा परिणाम आहे, असे ते म्हणाले.

बदल्यात फक्त शत्रुत्व मिळत असेल तर अंतर राखणे गरजेचे

भाषण करत असताना सीडीएस जनरल चौहान यांनी 2024 च्या राजनैतिक कूटनीतिची आठवण करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी समारंभासाठी तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले होते. पण टाळी वाजवण्यासाठी दोन हात लागतात. जर आपल्याला बदल्यात फक्त शत्रुत्व मिळत असेल, तर काही काळासाठी अंतर राखणे ही देखील एक शहाणपणाची रणनीती आहे, असे ते म्हणाले.

सिंगापूरमधील कार्यक्रमादरम्यान जनरल चौहान यांनी ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, नेदरलँड्स, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, यूके यासह अनेक देशांतील वरिष्ठ संरक्षण अधिकारी आणि लष्करी नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये, इंडो-पॅसिफिक प्रदेशात लष्करी सहकार्य वाढवणे, संरक्षण भागीदारी मजबूत करणे आणि सामान्य सुरक्षा आव्हानांना तोंड देणे यावर चर्चा झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;