बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकड्यांना दणका; सुरब शहरावर मिळवला ताबा

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकड्यांना दणका; सुरब शहरावर मिळवला ताबा

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकड्यांना मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील सुरब जिल्ह्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ताबा मिळवला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या सशस्त्र दलाने शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. BLA ने स्थानिक लेव्हीज पोलिस ठाणे आणि एक बँक ताब्यात घेतली आहे.

सुरब शहरातील प्रमुख भागांवर BLA ने ताबा मिळवला आहे. क्वेटा-कराची आणि सुरब-गिद्दर महामार्गांवर शोध आणि कडक तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आणि आजूबाजूला कडक नाकेबंदी करण्यात आली आहे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे.परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे आणि या भागाशी संपर्क जवळजवळ तुटला आहे. आतापर्यंत सरकार किंवा सुरक्षा संस्थांकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी एका निवेदनात दावा केला आहे की त्यांच्या सैनिकांनी सुरब शहर पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की स्थानिक बँका, लेव्ही आणि पोलिस ठाणी आता त्यांच्या ताब्यात आहेत. संघटनेकडून लवकरच सविस्तर निवेदन जारी केले जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;