हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय; हिंदी आमची ‘लाडकी बहीण’, मिंधे आमदार प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं

हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय; हिंदी आमची ‘लाडकी बहीण’, मिंधे आमदार प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं

हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे, अशी मुक्ताफळं मिंधे आमदार, राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उधळली आहेत. हिंदी भाषा आमची लाडकी बहीण आहे. मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी फक्त हिंदीतच बोलतो, असेही ते म्हणाले. यामुळे त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.

भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर परप्रांतीयांची मराठी कुटुंबांवरील मुजोरी वाढल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी ‘‘घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असे नाही,’’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता भाजपच्या वळचणीला बसलेल्या मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर थेट हिंदी ही मुंबईची बोलीभाषा असल्याचीच मुक्ताफळं उधळली आहेत. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय म्हणाले सरनाईक?

आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी, कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो, पण जेव्हा मिरा-भाईंदरमध्ये जातो तेव्हा हिंदी बोलतो. मराठी आमची मातृभाषा, आमची माय असे आपण म्हणतो, पण हिदी ही आपली लाडकी बहीण आहे, असे प्रताप सरनाईक एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

‘मेघा’साठी राज्याने नियम डावलले, कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळेबाज मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार; संजय राऊत यांचा सवाल

संजय राऊत यांनी घेतला समाचार

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांच्या विधानाचा समाचार घेतला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगता यावे, मराठी माणसाला आणि मराठीला सन्मान मिळावा यासाठी शिवसेनेची स्थापना केली. आता स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणारे मराठीबाबत काय भूमिका मांडत आहेत, ती त्यांची भूमिका नसून भाजप आणि अमित शहा यांची भूमिका आहे. त्यांचे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आहेत, त्यामुळे अमित शहा यांना जे हवे आहे, तेच हे लोकं बोलतात, अशा शब्दांत राऊत टोला लगावला.

मी स्वत:हून पक्ष सोडला नाही! देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा गौप्यस्फोट

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;