खडीने भरलेला ट्रक ट्रॉलीसह उलटला, चालक किरकोळ जखमी

खडीने भरलेला ट्रक ट्रॉलीसह उलटला, चालक किरकोळ जखमी

जामसंडे भटवाडी येथे पिंपळपार ते राममंदिर रस्त्याच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी खडी घेऊन आलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 4 वा. च्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पावसाने उसंती घेतल्याने जामसंडे भटवाडी येथे पिंपळपार ते राममंदिर रस्त्याच्या सुमारे 300 मी. संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. तेथे जाण्यासाठी भाई लाड यांच्या घरानजीकच अरुंद ‘पाणंद’ आहे. सायंकाळी 4 वा. च्या सुमारास तेथे खडी घेऊन गेलेला ट्रॅक्टर हा ट्रॉलीमधून खडी उतरविताना ट्रॉलीसह उलटला. मात्र, तेथे असलेल्या झाडाला ट्रॅक्टर अडकून स्थिरावल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेदरम्यान तेथे सुमारे दहा महिला व पुरुष कामगार काम करीत होते. चालकाला झालेल्या किरकोळ दुखापतीशिवाय सुदैवाने अन्य कोणालाही तेथे दुखापत झाली नाही. सुमारे दोन तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;