मी स्वत:हून पक्ष सोडला नाही! देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा गौप्यस्फोट

मी स्वत:हून पक्ष सोडला नाही! देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा गौप्यस्फोट

गेल्या 15 वर्षात जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये फिरून आलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी स्वत:हून पक्ष सोडला नाही, तर तडजोडीसाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पाठवण्यात आले, असे विधान प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन केले.

प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांच्यातून विस्तवही जात नाही हे सर्वश्रुत आहे. दोघांमधील विळ्या-भोपळ्याचे वैर अनेकदा जाहीर सभांमधूनही समोर आले होते. लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. याच अशोक चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांनी लीडर नाही तर डीलर असे म्हटले होते, याची आठवणही चिखलीकर यांनी करून दिली. तसेच ज्या पक्षात आहे ते पक्ष वाढवण्याची जबाबदारी असून नांदेडमध्ये आपल्यावर भुंकण्यासाठी काही लोक ठेवण्याची टीकाही त्यांनी नाव न घेता केली.

मुख्यमंत्र्यांना जालन्यात येण्यास लाज वाटते का? विराट मोर्चातील शेतकऱ्यांचा सवाल

चिखलीकरांच्या कोलांटउड्यांचा उतिहास

  • 2004 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत मतदारांनी त्यांना विजयी केले.
  • 2009 च्या निवडणुकीत त्यांना लोकभारती या पक्षाने उमेदवारी दिली. मात्र मतदारांनी त्यांना झिडकारले.
  • 2011 मध्ये प्रतापराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.
  • 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते शिवसेनेत आले. या निवडणुकीत मतदारांनी त्यांना भरघोस मते दिली.
  • 2018 मध्ये शिवसेना सोडून प्रतापराव भाजपवासी झाले. 2019 मध्ये भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांचा त्यांनी पराभव केला.
  • 2024 मध्ये आमदारकीच्या अपेक्षेने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;