मला मुस्लिमांबद्दल प्रेम पण…; साध्वी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीचे पाकड्यांबद्दल मोठे विधान

मला मुस्लिमांबद्दल प्रेम पण…; साध्वी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीचे पाकड्यांबद्दल मोठे विधान

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री तब्बल 25 वर्षांनी मुंबईत आली. यानंतर तिने महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनली. मात्र काही कारणास्तव तिला या पदावरून हटवण्यात आले. या सगळ्या प्रकरणामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. आता पुन्हा एका ती एका पाकिस्तानविषय़ी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेच आली आहे. मुसलमानांबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे, असे विधान तिने केले आहे.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना अभिनेत्री ममता कुलकर्णीने पाकिस्तानबाबत भाष्य केलं. मुसलमानांबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे. त्यांनीसुद्धा मला खूप प्रेम दिलं आहे. विशेषतः दुबईमध्ये. तिथे माझी अध्यात्मिक साधना 25 वर्ष चालली होती. त्या काळात मला खूप शांतता मिळाली आणि प्रेम मिळालं, असे ती यावेळी म्हणाली.

दरम्यान पाकिस्तानातून तिच्या चाहत्यांकडून तिला दररोज पत्र देखील यायची, असेही ममताने सांगितले. जेव्हा मी बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानमधून दररोज 50 तरी पत्रं यायची. त्यामुळेच माझ्या मनात मुसलमानांबद्दल खूप प्रेम आहे. पण दहशतवाद्यांबद्दल मात्र माझ्या मनात अजिबात प्रेम नाही. कारण दहशतवादी हा फक्त दहशतवादीच असतो. तो कधीच कोणाचा नवरा नसतो, कधीच कोणाचा पिता नसतो, आणि ना कोणाचा मुलगा असू शकतो. तो फक्त एक दहशतवादी आहे, असे यावेळी ममता म्हणाली.

सध्या हिंदुस्थान पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशातच ममताने केलेली पाकिस्तान बाबतची विधाने चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;